उस्मानाबाद,दि.20:- उन्नत शेती – समृध्द शेतकरी मोहिमेंतर्गत विविध योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्याकरीता इच्छुक शेतकऱ्यांचे 15 जून 2017 अखेर पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.
भूम,परंडा,कळंब व वाशी तालुक्यातून प्राप्त झालेल्या अर्जांची जेष्ठता यादी तयार करण्यासाठी दि. 22 जून 2017 रोजी कृषी चिकित्सालय वाशी येथे सोडत काढण्यात येणार असून भूम तालुक्याची सकाळी 11 वाजता व परंडा तालुक्याची दुपारी 2 वाजता सोडत काढण्यात येणार आहे.वाशी तालुक्याची दि.23 जून 2017 रोजी सकाळी 11 वाजता तर कळंब तालुक्याची दुपारी 2 वाजता सोडत काढण्यात येणार आहे.अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी या सोडतीस उपस्थित राहावे, असे आवाहन भूम उपविभागीय कृषी अधिकारी श्री.आर.टी.जाधव यांनी केले आहे.