Monday, 19 June 2017

उस्मानाबाद येथे 6 जुलै रोजी मानसेवी होमगार्ड सदस्य नोंदणी


उस्मानाबाद.दि.19:- जिल्हयातील उस्मानाबाद, परंडा, उमरगा, कळंब, भूम, तुळजापूर पथकांमध्ये पुरुष व महिला होमगार्ड तसेच येडशी उपपथकामध्ये पुरुष होमगार्डची सदस्य नोंदणी दि.6 जुलै 2017 रोजी पोलीस मुख्यालय उस्मानाबाद येथे सकाळी 7 वाजल्यापासून आयोजित करण्यात आली आहे.यामध्ये 304 पुरुष तर 139 महिला असे एकूण 443 होमगार्ड सदस्यांची नोंदणी आयोजित केलेली आहे, असे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

            होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे असतील, शैक्षणिक अर्हता कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असावा, वयोमर्यादा दि. 5 जुलै 2017 रोजी कमीत कमी 20 वर्षे पूर्ण व ते 50 वर्षे पर्यंत, उंची पुरुषांकरिता कमीत कमी 162 सें.मी. व महिलांकरिता 150 सें.मी. असावी, शारिरीक चाचणी पुरुष उमेदवार -1600 मीटर धावणे व गोळाफेक तर महिला उमेदवार -800 मीटर धावणे व गोळाफेक अशी राहील.