Monday, 19 June 2017

अपंग प्रशिक्षण केंद्रात 30 जून पर्यंत अर्ज पाठवावेत


 उस्मानाबाद,दि.19:- नांदेड जिल्हयातील देगलूर येथील तुळजाभवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, या संस्थेत महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबईमार्फत शासनमान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी 15 ते 35 वयोगटातील अपंग व मूकबधीर मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे  इच्छुक अपंग मुला-मुलींनी, पालकांनी दि.30 जून पर्यंत अर्ज करावेत, असे संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
या प्रशिक्षण केंद्रात संगणक प्रशिक्षण (सी.सी.ईन.इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर टायपिंग), वेल्डर आणि सीट मेटल, शिवण व कर्तन कला आणि सी.सी.इन.सौंदर्यशास्त्र, सी.सी.इन वायरमन आणि प्लंबर, सी.टी.सी. इत्यादी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. संस्थेत अपंग आणि मूकबधीर प्रशिक्षणार्थींना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. प्रवेशितांची निवासाची, वैद्यकीय औषधोपचाराची व प्रशिक्षण साहित्याची विनामूल्य सोय केली आहे.प्रवेशितांना प्रति माह विद्यावेतन देण्यात येईल.

तरी इच्छुक अपंग मुला मुलींनी, पालकांनी दि.30 जून 2017 पर्यंत, प्राचार्य, तुळजाभवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,शिवनेरी नगर, रामपूर रोड, देगलूर जि.नांदेड येथे मो.नं. 9960900369, 9175446411, 7276320578 या नंबरवर संपर्क साधावा अथवा प्रत्यक्ष भेटावे, असे या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यांनी कळविले आहे.