उस्मानाबाद,दि.19:-महाराष्ट्र शासनाचे
लोकप्रिय मुखपत्र असलेल्या “लोकराज्य” मासिकाची उपयुक्तता
लक्षात घेवून राज्यातील या वर्षातील
पहिली लोकराज्य प्रशिक्षण बॅच बनण्याचा
मान उस्मानाबादमधील स्टेट बॅंक ग्रामीण
स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतील मोबाईल रिपेअरिंग बॅच ने पटकाविला आहे. या बॅचमधील सर्वच म्हणजे एकूण
30 प्रशिक्षणार्थ्यांनी तसेच स्टेट बॅंक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या संचालक व सर्व प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी “लोकराज्य” चे वार्षिक
सभासदत्व स्वीकारले आहे.
उस्मानाबाद जिल्हयाचे जिल्हा माहिती
अधिकारी मनोज शिवाजी सानप
हे या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाचे प्रमुख पाहुणे म्हणून
या संस्थेत उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना इतर
मार्गदर्शनासोबतच माहिती व जनसंपर्क विभागाचे उपक्रम, “लोकराज्य”
मासिक, “महान्यूज” वेबपोर्टल यांचे महत्व आणि उपयोगिता समजावून सांगून संपूर्ण बॅचने 100
टक्के “लोकराज्य” चे सभासदत्व स्वीकारावे असे आवाहन केले,
त्यांच्या या आवाहनाला स्टेट
बॅंक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने व प्रशिक्षणार्थ्यांनी तात्काळ
सकारात्मक प्रतिसाद देवून “लोकराज्य” चे सभासदत्व स्वीकारले.
यातील
काही प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,आम्ही जिल्हा माहिती
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा उपयोग शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी
करू,तसेच त्या माध्यमातून समाजाचा व गावाचा विकास साध्य करण्याचा प्रामाणिक
प्रयत्न करू.
यावेळी संस्थेचे संचालक
श्री. मिलिंद सावंत,
लिड बॅंकेचे व्यवस्थापक श्री. निलेश विजयकर, नाबार्ड
चे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री. विनायक
कोठारी , उमेद चे श्री.
शंकर पवार, प्रशिक्षक श्री. विकास गोफणे, श्रीमती
जीवनज्योती सरपाळे,
कलीम शेख, नंदकिशोर सुरवसे हे उपस्थित
होते.