Friday, 12 June 2026

स्वाधार योजनेसाठी शासकीय वसतिगृहास अर्ज करणे अनिवार्य मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

स्वाधार योजनेसाठी शासकीय वसतिगृहास अर्ज करणे अनिवार्य मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन धाराशिव दि.१२ (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय मुला- मुलींच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात येत असून,शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. जिल्ह्यात सध्या एकूण ११ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत.सन २०२६ - २७ या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.शालेय विभागातील विद्यार्थ्यांनी ३० जून २०२६ पर्यंत, तर इयत्ता ११ वी,१२ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी १५ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत. शासकीय वसतिगृहांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जात असल्याने काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकत नाही.अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासनाची ‘स्वाधार’ योजना उपलब्ध आहे.मात्र,स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.त्यामुळे इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी https://hmas.mahati.org या संकेतस्थळावर विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करावा,असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री.सचिन कवले यांनी केले आहे. ******