उस्मानाबाद.दि.18:-
जिल्हयात स्वच्छ भारत मिशनची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने सोमवार दि.17 जुलै 2017
रोजी एका दिवसात सकाळी 6.00 ते रात्री 12.00 या 12 तासात 10 हजार शौचलय बांधकाम करण्यासाठी खड्डे
खोदण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. रात्री 12 वाजता ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा
जास्त 776 जास्त खड्ड्याचे काम पूर्ण करुन उच्चांक गाठला
आहे.
यापूर्वी
तेलंगणा राज्यात 8 हजार खड्डे खोदण्याचा विक्रम केला होता. उस्मानाबाद जिल्ह्याने
तो मोडून काढत नवा विक्रम प्रस्थापित केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी श्री.आनंद रायते यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऐतिहासिक कामगिरी केली.
यामध्ये वाशी तालुक्यात एक हजार 50, भूम
एक हजार 523, परंडा एक हजार 537, कळंब एक हजार 523, तुळजापूर एक हजार 801,
उस्मानाबाद एक हजार 629, उमरगा एक हजार 738 असे एकूण 10 हजार 776 खड्डे खोदण्याचा
विक्रम केला आहे.
यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, सामाजिक
कार्यकर्ते , गटविकास अधिकारी, सर्व खातेप्रमुख, तालुका समन्वयक, समूह समन्वयक,
गाव स्तरावर काम करणारे सरपंच, ग्रामसेवक आणि गावातील इतर सर्व कर्मचारी यांचे
यासाठी महत्वाचे सहकार्य लाभले.