उस्मानाबाद,दि.20:- राज्य शासनाच्या “लोकराज्य”
मासिकातील माहितीचा ग्रामीण भागातील जनतेला व विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप
यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “आम्ही झालो लोकराज्य विद्यालय” या उपक्रमास प्रतिसाद देत भाटशिरपुरा
येथील “कै भाई
नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय” या विद्यालयने राज्यातील या वर्षीचे पहिले “लोकराज्य माध्यमिक विद्यालय” होण्याचा बहुमान
पटकाविलाआहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन
जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, संस्थेचे
अध्यक्ष बाबुराव जाधव, सचिव बाळासाहेब धस, संचालक उद्धवराव गपाट, कु.भाग्यश्री
गपाट, मुख्याद्यापक श्री.एस.एन.टेकाळे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जिल्हा माहिती
अधिकारी मनोज सानप म्हणाले की, “लोकराज्य” या मासिकामधील शासकीय
लेखांविषयीच्या माहितीचा विद्यार्थ्यांना
भविष्यातील स्पर्धा परिक्षांसाठी निश्चित उपयोग होणार आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची
माहिती मिळणार आहे.त्यामुळे लोकराज्यचे नियमित वाचन करण्याबाबत श्री. सानप यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
या आवाहनास संस्थेचे अध्यक्ष बाबुराव जाधव व शिक्षक सहकाऱ्यांनी सकारात्मक
प्रतिसाद देवून आश्वासन दिले की, यापुढे
इयत्ता 8 ते 10 वी च्या प्रत्येक वर्गात दररोज शाळेची प्रार्थना
संपल्याबरोबर लोकराज्य मासिकातील एका लेखाचे नियमित वाचन केले जाईल.
यावेळी कु.भाग्यश्री गपाट म्हणाल्या
की , आपल्या जीवनात काय बनायचे आहे ते आताच ठरवावे व त्या दिशेने वाटचाल करावी.
वाचन मोठया प्रमाणत असावे. क्रमिक पुस्तकांसोबत अवांतर वाचनही करावे यामुळे
कल्पनाशक्तीचा विकास होऊन ज्ञान प्राप्ती मोठया प्रमाणावर होते. स्वच्छतेचा मंत्र
नेहमी जपा त्यातून आपण निरोगी राहणार आहोत. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत स्वच्छता
पाळावी, हे केल्याने आपण निरोगी राहतो,असेही त्या
म्हणाल्या.
या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष बाबुराव जाधव. शेवटी आभार सचिव
बाळासाहेब धस यांनी मानले. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व संस्थेचे इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.