उस्मानाबाद, दि.5:- उस्मानाबाद जिल्हयात एकूण 436 मान्यताप्राप्त
ग्रंथालये असून त्यातील ग्रंथालय कार्यकर्ता, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना राजाराम
मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ता व ग्रंथालय संचालनालयाकडून राबविण्यात
येणाऱ्या अर्थसहाय्याच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती व्हावी, याकरिता जिल्हा
ग्रंथालयामार्फत आयोजित एक दिवसीय कार्यशाळा छायादीप लॉन्स दिलीप देशमुख नगर येथे
दि.3 सप्टेंबर रोजी संपन्न झाली.
कार्यशाळेची
सुरूवात राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ता चे महासंचालक डॉ.अरूण
चक्रवर्ती यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर धिरूभाई
अंबानी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी पाहुण्यांचे स्वागतगीताने स्वागत
केले.
यावेळी अध्यक्ष म्हणून ग्रंथालय
संचालक श्री. किरण धांडोरे व विशेष अतिथी म्हणून कोषागार अधिकारी श्री. विशाल पवार,
सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. क्षीरसागर, लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी
श्री. गजभारे,ग्रंथालय कार्यकर्ता श्री. संजय लोखंडे हे उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या पहिल्या
सत्रात पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय अधिकारी श्री.अनंत वाघ यांनी राजाराम मोहन रॉय
ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.या सत्रात औरंगाबाद
सहाय्यक ग्रंथालय संचालक श्री.अ.मा. गाडेकर व उस्मानाबाद जिल्हा ग्रंथालय संघाचे
सदस्य श्रीधर पवार हे सहभागी झाले होते तर दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र सार्वजनिक
ग्रंथालय अधिनियम व नियम या विषयावर माजी सहायक ग्रंथालय संचालक डॉ. रा.शं. बालेकर
यांचे व्याख्यान झाले व या सत्रात जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री.
व.ग.सूर्यवंशी हे सहभागी झाले होते.
कार्यशाळेचे
प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी तर आभार प्रदर्शन
ग्रंथालय निरीक्षक गजानन कुरवाडे यांनी केले.
यावेळी अक्रुर सोनटक्के,
सौदागर दादा, प्रवीण अणदूरकर, संजय जेवळीकर, उत्तम शिंदे,ह.रा. डेंगळे, हि. भ.
बिराजदार, श्री. लोमटे,श्री.चव्हाण, श्री. देवगुडे यांच्यासह जिल्हयातील ग्रंथालय
पदाधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते मोठया संख्येने या कार्यशाळेस उपस्थित होते.
