वृत्त क्र. 545
*पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या हस्ते जिल्हयातील विविध सामाजिक संस्था, शाळा,महाविद्यालये,व्यक्ती लोकराज्य पुरस्कार देवून सन्मानित*
उस्मानाबाद,दि.15(जिमाका):- ज्या सामाजिक संस्थांनी,शाळांनी, महाविद्यालयांनी, व्यक्तींनी शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या जनजागृतीकरिता झोकून देऊन काम केले आहे, अशा *लोकराज्यशाळा*-विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येरमाळा,तालुका- कळंब, *लोकराज्य महाविद्यालय* महाराष्ट्र संत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तेर, तालुका उस्मानाबाद, *लोकराज्य कृषी महाविद्यालय*-शासकीय कृषी महाविद्यालय, गडपाटी, तालुका- उस्मानाबाद, *लोकराज्य सामाजिक संस्था*- एकता फाउंडेशन, उस्मानाबाद, (अभिलाष लोमटे), प्रेरणा महिला सामाजिक बहुउद्देशीय संस्था,(पद्मिनी निंबाळकर), यश मेडिकल फाउंडेशन व व्यसनमुक्ती केंद्र, येरमाळा, (डॉ. संदीप तांबारे), *लोकराज्यग्राम* डकवाडी, आणि *लोकराज्यदूत* म्हणून डॉ.किरण शंकरराव थोरात, आदित्य गोरे, राजेंद्र धावारे, डॉ. संदीप तांबारे या सर्वांचा प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते आणि पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.