माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत लोककला व पथनाट्य यांची निवडसूचीसाठी अर्ज
करण्यास मुदत वाढविण्यात आली असून इच्छुक संस्था आता दिनांक १५ सप्टेंबर २०१८
पर्यंत अर्ज सादर करू शकतात. इच्छुक संस्थांनी संबधित जिल्हा माहिती अधिकारी
यांच्याकडे तर मुंबई आणि मुंबई उपनगरातील इच्छुक संस्थांनी उपसंचालक (माहिती),
कोकणभवन, नवी मुंबई यांच्याकडे अर्ज पाठवावेत असे आवाहन माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.