Monday, 16 July 2018
खरीप हंगाम 2018 मध्ये पिकाचा विमा हप्ता ऑनलाइन पद्धतीनेच भरणे बंधनकारक
जिल्ह्यात खरीप हंगामात कर्जदार शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत दि.31 जुलै तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दि.24 जुलै असून शेतकऱ्यांना विमा हप्ता ऑनलाइन पद्धतीनेच भरणे बंधनकारक आहे. ऐन वेळी सर्व शेतकऱ्यांनी विमा भरण्यास गर्दी केल्यास नेटवर्क कजंक्शन सारख्या अडचणी येऊ शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच बँकेमध्ये कॉमन सर्विस सेंटर, आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा वैयक्तिकरित्या ऑनलाइन पद्धतीनेच pmfby.gov.in या वेबसाईटवर पिक विमा हप्ता भरून घ्यावा.
त्याचबरोबर विमा हप्ता भरून घेणाऱ्या बँका करत असतील तर शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक यांच्या कार्यालयात दूरध्वनी क्रमांक 0 24 72 223 415 या नंबरवर तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा दूरध्वनी क्रमांक 24 72 222 815 वर संपर्क करावा. पिक विमा ऑनलाइन पद्धतीनेच बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांनी आतापासूनच पिक विमा भरण्यास सुरुवात करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी पराग सोमण व जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाडगे यांनी केले आहे.
****