Monday, 2 April 2018

उर्ससाठी 4 एप्रिलला स्थानिक सुट्टी

उस्मानाबाद दि.2:-  ऊर्ससाठी बुधवार, दि. 4 एप्रिल 2018 रोजी प्रशासनाने स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. दि. 8 जानेवारी 2018 रोजीच्या अधिसूचनेत बुधवार, दि. 4 एप्रिल 2018 रोजी हजरत ख्वॉजा शमशोद्यीन गाजी रहे उरुस निमित्त स्थानिक सुट्टी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी जाहीर केली आहे. 
ही स्थानिक सुट्टी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्था यांना लागू राहील.