महसूल व
वन विभाग (मदत व पुनर्वसन) महाराष्ट्र शासनाने हवामान खात्याच्या सूचनेनूसार सन
2018 या वर्षात उष्णतेची लाट दिर्घकाळपर्यंत असण्याचा अंदाज वर्तविला आहे.
या
परिस्थितीमध्ये उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना व त्याबाबतची सविस्तर
माहिती पुढीलप्रमाणे-
हे करावे :- तीव्र
उन्हात मुख्यत: दुपारी 12.00 ते 3.00 च्या दरम्यान बाहेर पडणे टाळावे, पुरेसे
पाणी पित राहावे, फक्त हलक्या रंगाच्या सुती कापडाचा वापर करावा, घराबाहेर पडताना
छत्री, टोपी, गॉगलचा वापर करावा, शिळे अन्न खाणे टाळावे, उन्हात काम करत असताना
आपला चेहरा व डोके ओल्या कपड्याने झाकावे, चक्कर येत असेल किंवा आजारी वाटल्यास
त्वरीत डॉक्टरांकडे जावे, ओआरएस, लस्सी, ताक, लिंबूपाणी इत्यादी घरगुती शितपेयांचे
भरपूर सेवन करावे, प्राण्यांना सावलीत ठेऊन त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावे.
हे करु नये :- दुपारी
12.00 ते 3.00 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, गडद घट्ट व जाड कपडे घालणे
टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावी.
उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या
व्यक्तींच्या उपचारासाठी घ्यावयाची काळजी:-
व्यक्तीला एखाद्या थंड जागी ठेवा, शरिराचे तापमान खाली
आणण्याचे प्रयत्न करा, ओल्या कपड्याने त्यांना पुसत रहा, डोक्यावर थंड पाणी टाका,
व्यक्तीला ओआरएस, लस्सी, ताक, लिंबूपाणी इत्यादी घरगुती शितपेय द्यावे, व्यक्तीला
ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा, व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करुन
उपचार सुरु करणे गरजेचे आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र खंदारे यांनी
प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 