Wednesday, 4 March 2026

धाराशिवमध्ये १०० विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू १० मार्चदरम्यान ऑनलाईन अर्ज मागविले

धाराशिवमध्ये १०० विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू १० मार्चदरम्यान ऑनलाईन अर्ज मागविले धाराशिव दि.४ मार्च (जिमाका) इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बी.ए.,बी.कॉम.,बी.एस्सी.अशा १२ वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज १० मार्च २०२६ पर्यंत मागविले आहे.गुणवत्तेनुसार निवड यादी ११ मार्च २०२६ रोजी अंतिम करून प्रसिद्ध करण्यात येणार असून, निवड यादीनुसार प्रवेश घेण्याची अंतिम मुदत दि.१२ मार्च २०२६ ते दि.२० मार्च २०२६ अशी राहील. जिल्ह्यात मुला-मुलींसाठी १०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आले आहे.वसतिगृह,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे असून,त्यासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत. या योजनेंतर्गत प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर उच्च शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वरील वेळापत्रकानुसार अर्ज करावेत,असे आवाहन सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, धाराशिव यांनी केले आहे. *****