वृत्त क्र. 315 दि.27 मे 2019
एस.टी महामंडळामार्फत
तुळजापूर मध्ये
टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकरने वाटप
उस्मानाबाद.
दि.27- बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी अंतर्गत तुळजापूर
तालुक्यातील टंचाईग्रस्त ग्रामीण भागातील दत्तक घेतलेल्या बोरी, कावलदरा व मोर्डा
या गावांना दि.19 मे 2019 पासून पिण्याच्या
पाण्याचा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
बोरी
येथे ग्रामसेवक सतीश शिंदे, उपसरपंच नितीन हावळे व ग्रामपंचायत सदस्य सचिन हावळे, कावलदरा
येथे सरपंच मधुकर राठोड व मोर्डा येथे सरपंच राजेंद्र शेंडगे यांच्या हस्ते या
गावांसाठी एस. टी. महामंडळामार्फत पिण्याच्या पाण्याचे टँकरचे उद्घाटन करण्यात
आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,
उस्मानाबाद विभागाचे विभाग नियंत्रक श्री. रा. य. साळवे, श्री. ह. शं. साळुंके ( यंत्र
अभियंता चालन ) ,श्री. अ. अ. जानराव (विभागीय वाहतुक अधिकारी श्री. रा. भ. पवार
(बांधकाम अभियंता राजकुमार दिवटे (आगार प्रमुख, तुळजापूर हे उपस्थित होते.
****
वृत्त क्र 316
जिल्हयात महाराष्ट्र
पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 प्रमाणे
वाहतूक नियंत्रण
व नियमनात्मक आदेश लागू
उस्मानाबाद.दि.27- जिल्हयात दि.05 जून 2019 रोजी रमजान ईद
(चंद्रदर्शनावर अवलंबून एक दिवस मागे पुढे ) साजरी होणार आहे.
तरी वरील उत्सव जिल्हयात शांततेत पार पडावेत, मिरवणुकीदरम्यान
वाहतुकीचे नियंत्रण व नियमन करणे आवश्यक आहे व कोणताही अनुचित प्रकार न घडता कायदा
व सुव्यवस्था अबाधित राहावी, तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यास त्या परिस्थितीवर
तात्काळ मात करता यावी, यासाठी पोलीस
अधीक्षक स्वाती भोर यांनी महाराष्ट्र
पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 प्रमाणे उस्मानाबाद जिल्हयातील सर्व पोलीस उप निरीक्षक
व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना दि.03 जून 2019 रोजी रात्री 12.00 ते
दि.07 जून 2019 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत
पुढीलप्रमाणे अधिकारी प्रदान केले आहेत.
सडकावरील किंवा सडकेने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा
जमावातील लोक कशा रितीने चालावेत, त्यांनी त्यांची वर्तणूक किंवा वागणूक कशी
ठेवावी, याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गाने जाव्यात
किंवा कोणत्या मार्गाने जावू नयेत ते मार्ग विहीत करणे.सर्व मिरवणुकीच्या व जमावांचे
प्रसंगी व प्रतिमा पूजनाच्या सर्व जागांच्या आसपास प्रतिमा पूजनाच्या वेळी व
कोणत्याही सडकेवरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याचे
जागी,गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असेल अशा सर्व ठिकाणी
अडथळा होवू न देणे. सर्व रस्त्यांवर, नद्यांच्या
घाटावर,सार्वजनिक ठिकाणी, स्नानाच्या किंवा कपडे धुण्याच्या ठिकाणी, जागे मध्ये बंदोबस्त
सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यात सडकेजवळ किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ
वाद्य वाजविणे आणि शिंगे,कर्कश वाद्य वाजविणे, यावर नियमन करणे अगर त्यावर
नियंत्रण ठेवणे. शासनाने नियुक्त केलेल्या सक्षम अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 33,34,37, ते 42,45 या कलमान्वये केलेल्या कोणत्याही नियमनात्मक आदेशाचे कोणत्याही
नियमनात्मक आदेशाचे अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
जी व्यक्ती वरील नियमनात्मक आदेशाचे कोणत्याही प्रकारे
उल्लंघन करेल ती व्यक्ती महाराष्ट्र पोलीस
अधिनियम कलम 134 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील,असे पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी कळविले आहे.
****
वृत्त क्र 317 दि.27
मे 2019
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटक
यांचा जून 2019 दौरा कार्यक्रम
उस्मानाबाद.दि.27-जिल्हयातील आजी / माजी
सैनिकांना / विधवांना तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी त्यांच्या अडीअडचणी
सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटक यांच्या माहे जून 2019
साठी सहामाही बैठकांचे आयोजन संबंधित तहसिल कार्यालयांमध्ये करण्यात आले आहे.या बैठकांमध्ये
आजी / माजी सैनिकांच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत चर्चा करण्यात
येणार आहे.
तरी संबंधित तालुक्यातील आजी
/ माजी सैनिकांनी / विधवांनी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित तहसील कार्यालय
येथे खाली नमूद केलेल्या तारखेस सकाळी 11.00 वाजता बैठकीसाठी उपस्थित राहावे.
तालुक्याचे नाव, बैठकीचा
दिनांक, वार पुढीलप्रमाणे.. 1. परांडा, दि.17 जून 2019 तिसरा सोमवार, 2. उमरगा,
दि.19 जून 2019 तिसरा बुधवार, 3. वाशी, दि.26 जून 2019 चौथा बुधवार, 4. लोहारा दि. 28 जून 2019 चौथा
शुक्रवार 5. उस्मानाबाद दि.25 जून 2019 चौथा मंगळवार.
संबधितांनी या बैठकांसाठी वेळेवर
उपस्थित राहावे.तसेच त्यांनी त्यांच्या तक्रारी /अडचणी लेखी स्वरुपात बैठकीमध्ये
सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर फिरासत यांनी
केले आहे.
****
वृत्त क्र 318
दि.27 मे 2019
खरीप
हंगामपूर्व महोत्सवाचे आयोजना करिता
इच्छुक
पुरवठादारांनी दरपत्रके सादर करावीत
उस्मानाबाद ,दि.27- प्रमुख खरीप
हंगामाचा विचार करता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध पीक पद्धती व पूरक व्यवसाय
यांचे मार्गदर्शन करण्याकरिता दि.2 जून ते 5 जून 2019 या कालावधीत उस्मानाबाद
जिल्हा खरीप हंगामपूर्व महोत्सवाचे आयोजन करण्याचे ठरले आहे.
जिल्हा
खरीप हंगामपूर्व महोत्सवाच्या आयोजनाकरिता हॉल,
मैदान, मंडप व्यवस्था, मुख्य प्रवेशद्वाराची कमान, लाईट व ध्वनीक्षेपण यंत्रणा,जनरेटर
व डिझेल व्यवस्था, स्टॉलधारक व शेतकरी यांना पिण्याचे व वापराच्या पाण्याची
व्यवस्था, 400 टेबल, 700 खुर्च्या, स्टेज व्यवस्था याकरिता राज्याच्या कृषि
विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणांकरिता सहाय्य आत्मा या अंतर्गत दोन लाख
दहा हजार इतक्या तरतुदीपर्यंत जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील पुरवठादारांकडून
दरपत्रके मागविण्यात येत आहेत.
या पुरवठादारास
महोत्सव संयोजनाचा अनुभव असावा, या व्यवस्थेकरिता लागणाऱ्या साहित्यांचा पुरावा
असावा, कृषी विभागाच्या किमान एका जिल्हा कृषी महोत्सव आयोजनाचा अनुभव असावा, असे
प्रकल्प संचालक आत्मा श्री. जितेंद्र शिंदे यांनी कळविले आहे.
ही दरपत्रके दि.
28 मे 2019 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आत्मा कार्यालय, रामनगर, मध्यवर्ती प्रशासकीय
इमारतीसमोर, कापसे बिल्डींग, पंजाब नॅशनल बँकेच्या वर,
दुसरा मजला, उस्मानाबाद, पिन कोड
क्रमांक 413 501 येथे सादर करावीत व अधिक माहितीसाठीही येथेच संपर्क साधावा, असे प्रकल्प
संचालक प्रकल्प संचालक आत्मा श्री. शिंदे यांनी कळविले आहे.
******
वृत्त क्र 319
दि.27 मे 2019
खरीप
हंगामपूर्व महोत्सवाचे आयोजना करिता
इच्छुक
पुरवठादारांनी दरपत्रके सादर करावीत
उस्मानाबाद ,दि.27- प्रमुख खरीप
हंगामाचा विचार करता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध पीक पद्धती व पूरक व्यवसाय
यांचे मार्गदर्शन करण्याकरिता दि.2 जून ते 5 जून 2019 या कालावधीत उस्मानाबाद
जिल्हा खरीप हंगामपूर्व महोत्सवाचे आयोजन करण्याचे ठरले आहे.
जिल्हा खरीप हंगामपूर्व महोत्सवाच्या
आयोजनाकरिता 2 मीटर x 3 मीटर आकाराचे किमान 125 प्री-फॅब्रिकेटेड स्टॉल उभे करणे,
आवश्यकतेप्रमाणे बॅरेकेटिंग, महोत्सवाच्या ठिकाणी कार्पेट-चटई इत्यादी व्यवस्था,
कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वच्छता व सिक्युरिटीची व्यवस्था, अग्निशमन बंब, खरीप
हंगामपूर्व महोत्सवाबाबत प्रचार व
प्रसिद्धी याकरिता राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक
सुधारणांकरिता सहाय्य आत्मा या अंतर्गत एक लाख नव्वद हजार इतक्या तरतुदीपर्यंत
जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील पुरवठादारांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत.
या पुरवठादारास
महोत्सव संयोजनाचा अनुभव असावा, या व्यवस्थेकरिता लागणाऱ्या साहित्यांचा पुरावा
असावा, कृषी विभागाच्या किमान एका जिल्हा कृषी महोत्सव आयोजनाचा अनुभव असावा, असे
प्रकल्प संचालक आत्मा श्री. जितेंद्र शिंदे यांनी कळविले आहे.
ही दरपत्रके दि.
28 मे 2019 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आत्मा कार्यालय, रामनगर, मध्यवर्ती प्रशासकीय
इमारतीसमोर, कापसे बिल्डींग, पंजाब नॅशनल बँकेच्या वर, दुसरा मजला, उस्मानाबाद,
पिन कोड क्रमांक 413 501 येथे सादर करावीत व अधिक माहितीसाठीही येथेच संपर्क
साधावा, असे प्रकल्प संचालक प्रकल्प संचालक आत्मा श्री. शिंदे यांनी कळविले आहे.
***
वृत्त क्र 320
दि.27 मे 2019
मृद व जलसंधारण विभागामार्फत
एकदिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
उस्मानाबाद ,दि.27- मृद व
जलसंधारण विभाग व जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कार्य हस्तांतरण व लोकसहभागाने
देखभाल व दुरुस्ती हा एकदिवसीय प्रशिक्षण वर्ग मृद व जलसंधारण विभाग उस्मानाबाद
आणि जल व भूमी व्यवस्थापन वाल्मी औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती
प्रशासकीय इमारतीतील डीपीडीसी हॉल येथे मंगळवार, दि. 28 मे रोजी, सकाळी 9.00 वाजता
आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.30
वाजेपर्यंत आहे,असे जलसंधारण विभागाचे
कार्यकारी अभियंता श्री. कांबळे यांनी कळविले आहे.
****
|
|
वृत्त क्र 321 दि.27
मे 2019
लोकसभा
सार्वत्रिक निवडणूक 2019 करिताची
आचारसंहिता
संपुष्टात
उस्मानाबाद.दि.27- भारत निवडणूक आयोगाच्या
निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी लागू करण्यात आलेली आदर्श
आचारसंहिता संपुष्टात आणण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी
कळविले आहे.
****