उस्मानाबाद,दि.5:-अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यानी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत
अर्ज स्वीकारणे करीता दि. 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली
आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकेत्तर शिक्षण घेता यावे
म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून
घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांच्याआधार
संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ
घेण्यासाठी 10 वी, 12 वी पदवी परीक्षेमध्ये 50% पेक्षा
जास्त गुण असणे अनिवार्य आहे.अटी, व शर्ती पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनीच अर्ज
करावेत ,अर्जाचा विहित नमुना http://mahaeschol.maharashta.gov.in http://sjsa.maharashta.gov.in, http://www.maharahtra.gov.in या संकेतस्थळा वर उपलब्ध केला आहे. सोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या यादीसह अर्ज
सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण उस्मानाबाद,
प्रशासकीय इमारत उस्मानाबाद या कार्यालयामध्ये समक्ष, टपालाद्वारे अथवा dswo2000@yahoo.com या ई मेल
वर दि.15 मार्च 2018 पर्यंत दाखल करावेत असे आवाहन
समाज कल्याण उस्मानाबाद चे सहाय्यक आयुक्त
श्रीमती मते यांनी केलं आहे.