उस्मानाबाद. दि.8:- उस्मानाबाद
जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये 13 मार्च रोजी विशेष ग्रामसभा होणार आहे. या
ग्रामसभेत जि.पी.डी.पी. आराखडयात बदल आवश्यक असणाऱ्या ठिकाणी ठराव घेणे, अद्याप
अंमल न झालेल्या गावांमध्ये एकत्रीकरण योजना राबविणे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त
शिवारसाठी आवश्यक गावांमध्ये ठराव घेणे, वृक्ष लागवड 2018 साठी प्रचार-प्रसिध्दी
करणे, स्थळ निश्चीती करणे व खड्डे खोदण्याचे नियोजन करणे, पालकमंत्री शेत/ पाणंद रस्ते
योजना, बळीराजा चेतना अभियान अंतर्गत जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडील शेळी गट
वाटप करण्यासाठी लाभार्थी निवड इत्यादी बाबींवर चर्चा करुन ग्रामसभेत आवश्यक ते
ठराव घेण्यात यावेत, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय
कोलते यांनी दिल्या आहेत.
