Tuesday, 12 May 2026
१०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे वाटप ; पशुपालकांना अर्ज करण्याचे आवाहन
१०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे वाटप ; पशुपालकांना अर्ज करण्याचे आवाहन
धाराशिव,दि.१२ मे (जिमाका) पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वतीने सन २०२६ - २७ या आर्थिक वर्षात पशुपालकांसाठी विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून,दुभत्या जनावरांना पुरेसे व दर्जेदार खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी “दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम)” अंतर्गत १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे वाटप करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी इच्छुक लाभार्थ्यांकडून ३१ मे २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा उप आयुक्त,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय,धाराशिव यांनी केले आहे.
योजनेअंतर्गत दुभत्या जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविणे,पशुखाद्य विकासाला चालना देणे आणि पशुपालकांचा खर्च कमी करणे हा उद्देश असून, पात्र लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
योजनेविषयी अधिक माहितीसाठी पशुपालकांनी आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी तसेच पंचायत समिती स्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्जाचा विहित नमुना,मार्गदर्शक सूचना,नियम,अटी तसेच आवश्यक कागदपत्रांची यादी पशुसंवर्धन विभाग,पंचायत समिती कार्यालय, येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्जासाठी पुढील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSctKBS3qJ9Gz-IxPrJZGUTWn_EagSCQtKMlywq_h5QygHBDYg/viewform?usp=sharing&ouid=118136150394133561125
या लिंकद्वारे १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे मागणीसाठी अर्ज सादर करता येणार असून,जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले आहे.
*****