Thursday, 19 February 2026

छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती धाराशिवमध्ये जल्लोषात ; दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पणाने अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती धाराशिवमध्ये जल्लोषात ; दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पणाने अभिवादन धाराशिव दि.१९ फेब्रुवारी (जिमाका) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व प्रेरणादायी राष्ट्रनायक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती आज धाराशिव येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या हस्ते मंत्रोच्चारात दुग्धाभिषेक करण्यात आला.यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी परिसरात जयघोष आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निता अंधारे, तहसिलदार मृणाल जाधव,प्रकाश व्हटकर,विविध विभागांचे अधिकारी -कर्मचारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष उत्साहाचे वातावरण लाभले ******