उस्मानाबाद,दि.7:जागतिक
महिला दिनानिमित्त विभागीय स्तरावर तसेच
जिल्हा, तालुका व गाव
पातळीवर मोठया प्रमाणात
साजरा होण्याच्या दृष्टीकोनातून विभागीय आयुक्त श्री. पुरुषोत्तम भापकर व
जिल्हाधिकारी श्री. प्रशांत नारनवरे यांनी वेळोवेळी आढावा बैठक घेवून जागतिक
महिला दिन हा
विविध उपक्रमांनी व
प्रभावीपणे साजरा करण्याबाबत सूचना केल्या आहेत.
जागतिक महिला दिनाची
प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून उस्मानाबाद
तालुका अंतर्गत सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, ग्रामरोजगार सेवक यांची कार्यशाळा तहसिल कार्यालय उस्मानाबाद
येथे दिनांक 7 मार्च रोजी आयोजित करण्यात
आली होती.
या
कार्यशाळेस तहसिलदार उस्मानाबाद, नायब तहसिलदार, गट विकास अधिकारी
उस्मानाबाद, तालुका कृषी अधिकारी उस्मानाबाद,
वन अधिकारी उस्मानाबाद, लागवड अधिकारी उस्मानाबाद, उप अभियंता
सिंचन/बांधकाम हे उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये गावपातळीवर
शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायतमध्ये विविध
उपक्रम घेवून जागतिक महिला दिन साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या
तसेच दिनांक 8 मार्च रोजी विशेष महिला
ग्रामसभा घेणे, बेटी बचाव बेटी
पढाओ व महिला सुरक्षा
कार्यक्रम राबविणे, मनरेगा- 100% नवीन जॉबकार्ड वाटप करणे, मनरेगा-
जॉबकार्ड नूतनीकरण करणे,समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत 11
कामांची माहिती ग्रामस्थांना
देणे, वैयक्तिक लाभाच्या कामासाठी
लाभार्थी निवड करणे व ग्रामसभा
ठराव घेणे,सिंचन विहीर, वैयक्तिक शौचालय, शेततळे, फळबाग लागवड,
शेळी/गुरे/कुक्कुटपालन शेड, शोषखडडे, व्हर्मी/नाडेप
कंपोस्टींग, वृक्ष लागवड आणि सार्वजनिक स्वरुपाच्या ग्राम सबलीकरण अंतर्गत
कामाची निवड करणे,संजय गांधी
निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे 100 टक्के आधार सिडींग
व बॅक खात्याशी संलग्न करणे,
लाभार्थ्याचे थेट लाभ खात्यामध्ये जमा
करणे (Direct Benefit Transfer) साठी राष्ट्रीयकृत
बँकेचे खाते,आधार क्रमांक,मोबाईल
क्रमांक गोळा करणे,अपात्र लाभार्थी शोधणे, पात्र
लाभार्थी शोधून त्यांना
योजनेची माहिती देवून
अर्ज भरण्यास प्रवृत्त
करणे, सामाजिक व न्याय
विभागाच्या विविध योजनांची माहिती
ग्रामस्थांना देणे, सार्वजनिक
वितरण व्यवस्थेंतर्गत दोन दिवसीय कॅम्प आयोजित करुन नवीन युनिट रजिस्टर तयार
करणे,सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत आधार सिडींग 100% पूर्ण
करणे,महिलांचा विशेष सहभाग असणा-या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे या बाबी प्रभावी व
परिणामकारकरित्या राबविण्याबाबत
सूचित करण्यात आले.
तसेच या विषयांची
ग्रामसभेत चर्चा करुन या योजनांमध्ये
महिलांचा विशेष सहभाग नोंदविणेबाबत कार्यशाळेत सूचना देण्यात आलेल्या असून
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तहसिल कार्यालय उस्मानाबाद येथे दिनांक 08मार्च
रोजी महिला आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे तसेच महिला सुरक्षा
कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी तथा
उस्मानाबाद तहसिलदार आयुष प्रसाद यांनी दिली आहे.