उस्मानाबाद,दि.16:- उमरगा तालुक्यातील येणेगूर, महालिंगरायवाडी, बेळंब,
भुसणी, औराद, गुंजोटीसह विविध गावात अवकाळी पावसासह गारपीट झालेल्या भागात जावून शुक्रवारी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी शेती
पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली, आणि शेतकऱ्यांशी चर्चाही केली.
यावेळी उमरगा उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी, तहसिलदार अरविंद बोळंगे, तुळजापूर तहसिलदार दिनेश झांपले तसेच
तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांची प्रमुख उपस्थिती
होती. या पाहणी दरम्यान श्री. गमे यांनी केशव राजाराम गायकवाड-येणेगूर, श्रीशैल
सिद्राम बिराजदार-येणेगूर, हिराचंद रंगराव चव्हाण- महालिंगरायवाडी, आप्पाराव लक्ष्मण
लिंबाळे- बेळंब, सिद्राम केशव
माणगे-बेळंब, ललिता हिंगमिरे-भुसणी, शालनबाई जाधव- भुसणी, प्रशांत देशमुख-औराद, श्रीकृष्ण आण्णाराव पाटील-गूंजोटी या
शेतकऱ्यांची भेट घेवून चर्चा केली आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.
जिल्हाधिकारी श्री. गमे यांनी तात्काळ शेती
पिकांच्या झालेल्या नूकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
दिले. तसेच शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी कृषी अभ्यासक, कृषी विज्ञान
केंद्र, तुळजापूरच्या शास्त्रज्ञांची मदत घ्यावी, अशा सूचनाही यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या.