उस्मानाबाद.दि.18:-
जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय व काळजी व आधार केंद्र
यांच्याकडून एचआयव्ही संसर्गीत व्यक्तीचे शासकीय योजनेसाठी दाखल
केलेल्या आर्जावर संबंधित
अधिकऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करुन जिल्ह्यातील सर्व एचआयव्ही संसर्गीत
व्यक्तीस शासकिय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्ण
गमे यांनी बैठकित
दिल्या.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रुग्णालयातील विविध समितींच्या बैठका
पार पडल्या. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले,
जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे,
अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंचला बोडखे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रताप
शिंदे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी गणेश काकडे, सर्व वैद्यकिय अधिक्षक, सर्व
जिल्हा समन्वयक, इतर विभागचे अधिकारी
उपस्थित होते.
पीसीपीएनडिटीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री.गमे, म्हणाले की,
जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर प्रमाण घसरत आहे. मुलींचे जन्मदर प्रमाण वाढण्याच्या
दृष्टीने सुक्ष्म नियोजन करुन योग्य ती कार्यवाही करावी, या कामी अधिकारी,
कर्मचारी यांचा हलगर्जीपणा दिसून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे
आदेश दिले. पुढिल बैठकीस येताना आरसीएच पोर्टलवर नोंदणी झालेल्या प्रत्येक गरोदर
माचे आउटकम काय आहे याची माहिती घेऊन येण्यास सांगीतले.
जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण समितीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री.
गमे म्हणाले की, जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय व काळजी व
आधार केंद्र यांच्याकडून एचआयव्ही संसर्गीत व्यक्तीचे दाखल केलेल्या आर्जावर
तात्काळ कार्यवाही झाली पाहीजे असे आदेश सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी व संजय
गांधी योजना तहसिलदार यांना दिले. जिल्ह्यातील सर्व एचआयव्ही संसर्गीत व्यक्तीस
शासकिय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असून त्यासाठी
संबंधीतांकडून योग्य त्या पदधतीने अर्ज भरुन तहसील मध्ये दाखल करावेत, या मध्ये
काही अडचणी आल्यास निवासी जिल्हाधिकारी
श्री. राजेंद्र खंदारे यांच्याशी संपर्क साधावा, त्यांची निवड ही जिल्ह्यातील
संसर्गीतांना सर्व शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्याकरीता जिल्हा नोडल ऑफिसर
म्हणून करण्यात आली असल्याचेही
त्यांनी सांगीतले.
विधवा निराश्रित महिला बचत गटांकडून तयार करण्यात आलेल्या पेपर बॅगचे कौतुक
करत त्यांनी संपुर्ण जिल्हा हा कॅरीबॅग मुक्त करण्याचा मानस देखिल बोलुन दाखवला.
यामाध्यमातून महिलांना रोजगार मिळले व पर्यावरण स्वच्छ राखण्यास मदत होईल. सदर बचत
गटाकडून सर्वांनी पेपरबॅग विकत घेण्याचे आव्हान केले.
या बैठकिमध्ये राष्ट्रीय
किशोरवयीन स्वास्थ कार्यक्रम, महाराष्ट्र एमर्जेंसी मेडिकल सर्विसेस (108 गाडी
) व
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य जीवनदायी योजनेचा आढावा घेण्यातआले. यावेळी बैठकिस
उपस्थित नसलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस देण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी
दिले.
