उस्मानाबाद जिल्हा हा आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित
करण्यात आला आहे. या प्रक्रियेत आरोग्य, महिला व बालकल्याण, स्वच्छता, शिक्षण या
प्रमुख बाबींवर विशेष लक्ष देऊन या क्षेत्रात जास्तीत जास्त चांगली कामे करण्याचा
जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
त्या
अनुषंगाने समाजातील महत्त्वाच्या व्यक्तींनी, सर्वसामान्यांनी, तज्ञांनी खुली
चर्चा करून उस्मानाबादच्या विकासासाठी आपले अमूल्य योगदान दयावे, या हेतूने दिनांक
29 व 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह,
नगरपरिषद, उस्मानाबाद येथे “उस्मानाबाद जीवनरेखा- एक मुक्त
चर्चा” चे आयोजन करण्यात आले आहे.
तरी
या खुल्या चर्चेच्या माध्यमातून वरील
विषयांवर चर्चा होऊन ठोस उपाययोजना सुचविण्यासाठी आणि त्यांच्या अंमलबजावणीचा
आराखडा तयार करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून उस्मानाबादच्या
उज्वल भवितव्यासाठी आपले सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व युनिसेफच्या
वतीने करण्यात आले आहे.